Atheist professor – नास्तिक प्रोफेसर

एक दिवस शिक्षकांनी (ज्यांना स्वताला नास्तिक म्हणून घेणे म्हणजे अभिमान वाटायचा) त्यांनी वर्गातील एका नवीन विद्यार्थ्यास उभे केले.

प्रो. : तर तुझा देवावर विश्वास आहे का?

वि. : हो निश्चितच सर..

प्रो. : देव हा चांगला आहे?

वि. : हो सर

प्रो. : देव हा सर्व शक्तिमान आहे?

वि. : हो सर अर्थातच ..

प्रो. : माझा भाऊ कॅन्सरने वारला त्या आधी त्याने देवाची खुप प्रार्थना केली. आपल्यातला कोणी आजारी असतो तेव्हा आपणही त्याच्या मदतीला धावतो मग देवाने का मदत केली नाही? का देव चांगला नाही?
(सर्व वर्ग शांत झाला).
कोणीही याचे उत्तर देऊ शकत नाही. बरोबर? ठीक आहे मित्रा मी अजून काही विचारतो.’

प्रोफेसर पुढे बोलू लागले.

प्रो. : राक्षस चांगले आहेत?

वि. : नाही सर ..

प्रो. : कोणी बनवले यांना देवानेच ना.?

वि. : हो सर…

प्रो. : दृष्ट आत्मा किंवा लोक ते चांगले आहेत?

वि. : नाही सर ..

प्रो. : त्यांनाही देवानेच बनवले. हो ना?

वि. : हो सर…

प्रो. : या जगातील आजारपण,अमानुषता, दु:ख, कुरुपता या सर्व वाईट आणि भयानक गोष्टी जगात आहेतच ना? कोणी निर्माण केल्या?’

(विद्यार्थी शांत होता) प्रोफेसर पुन्हा म्हणाले.

प्रो. : विज्ञान सांगते तुम्हाला ५ ज्ञानेंद्रीय आहे ज्याने तुम्ही आजूबाजूचे जग समजून घेऊ शकता. सांग मित्रा तु कधी देवाला पाहीलेस?

वि. : नाही सर …

प्रो. : कधी देवाला ऐकलेस? स्पर्श केलास? कधी चव पाहीलीस? अशी कोणतीही गोष्ट सांग ज्याने तुला देवाविषयी ज्ञान आले आहे?

वि. : नाही सर… असे काहीही नाही.

प्रो. : मग निरीक्षणार्थ,परीक्षणार्थी विज्ञान असा निष्कर्ष लावू शकतो की ‘देव’ ही संकल्पना अस्तित्वातच नाही. मग याला तु उत्तर काय देशील?

वि. : मी म्हणेन माझी श्रद्धा आहे.

प्रो. : हो यस, श्रद्धा आणि ईथेच विज्ञानाचे घोडे अडते. माणुस विचार करणे सोडतो. आणि सगळे श्रद्धेवर सोपवून मोकळा होतो.

वि. : माफ करा सर. मी तुम्हाला काही प्रश्न विचारु का?

प्रो. : अवश्य …

वि. : सर उष्णता नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का? .

प्रो. : हो आहे ना.

वि. : आणि शीतलता?

प्रो. : हो अर्थातच …

वि. : नाही सर.. असे काहीच अस्तित्वात नाही.(वर्गात एकदम पिनड्रॉप शांतता झाली) सर आपण उष्णता कितीही निर्माण करु शकतो. पण शीतलता कधीच नाही. आपण शुन्य डीग्रीच्या ४५८ डीग्री खाली जातो आणि त्या तापमानाला No Heat तापमान म्हणतो. म्हणजेत उष्णतेची कमतरता म्हणजे शीतलता.’

(वर्ग लक्षपुर्वक ऐकत होता)

वि. : अंधाराबद्दल काय मत आहे सर आपले. ते अस्तित्वात आहे?

प्रो. : हो आहे ना.. रात्र म्हणजे काय अंधारच ना?

वि. : तुम्ही पुन्हा चुकत आहात. आपले तर्कशास्त्र थोडेसे चुकीचे आहे .

प्रो. : कसे काय सिद्ध करुन दाखव.

वि. : जर आपण सृष्टीच्या द्वैततत्वावर भाष्य करत असाल तर जिथे जन्म आहे तिथे मृत्यु आहेच. चांगला देव वाईट देव ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे. तुम्ही देवाला एखादी मोजता येणारी किंवा स्पर्श करता येणारी गोष्ट समजत आहात.

विज्ञान हे केवळ डोक्यात येणारे विचारही कसे असतात हे विश्लेशीत करु शकत नाही. ज्या विचारांबद्दल विज्ञान सर्वोच्च नोबेल पारीतोषिक देऊन सन्मान करते. जरा विचित्र नाही वाटत? .

विज्ञान चुंबकीय आणि विद्युत शक्तीचा वापर करते त्याचा उगमस्त्रोत माहीत नसुनही हे वेडेपणाचे नाही वाटत …

मृत्यु हा काही जीवनाचा विरुद्ध अर्थी शब्द नाही .. फक्त जीवनाची कमतरता म्हणजे मृत्यु.

सर आपण ही गोष्ट मानता का की आपण माकडांचे वंशज आहोत ..

प्रो. : हो मी मानतो ..उत्क्रांतीचा सिद्धांत आहे तसा.

वि. : मला सांगा सर आपण ही उत्क्रांती स्वताच्या डोळ्यांनी पाहीली? नाही. मी ही नाही याचा अर्थ असा होतो का की आपण अजूनही माकडच आहोत ….

(सर्व वर्गात हशा पिकला)

सर शेवटचा प्रश्न मी क्लासला विचारतो .. तुम्ही कधी प्रोफेसर सरांचा मेंदू पाहीलाय … कधी चव घेतलीय कधी स्पर्श केलाय? नाही ना? माफ करा सर मग आम्ही तुम्ही जे शिकवता ते खरे आहे हे आम्ही कसे समजून घेऊ?

प्रो. : Well त्यासाठी तुम्हाला माझ्यावर श्रद्धा ठेवावी लागेल ..
(आता प्रोफेसर हासत होते. पहील्यांदा त्यांना तोडीस तोड कोणीतरी भेटले)

वि. : एक्झॅक्टली .. सर .. देव आणि माणुस या मधील दुवा म्हणजे श्रद्धा …दुर्दैव..म्हणजे श्रद्धेचा आभाव दुसरे काही नाही….

हा किस्सा २००८ पासून तरी पाठवला जातोय. त्यात विद्यार्थ्याचे नाव ए पी जे अब्दुल कलाम, आईन्स्टाईन किंवा स्वामी विवेकानंद असा बदलून बदलून बघितलेला आहे. तुम्हाला कोणत्या नावाने आला आहे हा किस्सा?

An atheist professor of philosophy speaks to his class on the problem science has with God, The Almighty.
He asks one of his new students to stand and…..

Prof: So you believe in God?
Student: Absolutely, sir.
Prof :  Is God good?
Student: Sure.
Prof: Is God all-powerful?
Student :  Yes..
Prof: My brother died of cancer even though he prayed to God to heal him.
Most of us would attempt to help others who are ill. But God didn’t. How is this God good then? Hmm?
(Student is silent.)
Prof: You can’t answer, can you? Let’s start again, young fella. Is God good?
Student: Yes.
Prof: Is Satan good?
Student :  No.
Prof: Where does Satan come from?
Student: From….God…
Prof: That’s right. Tell me son, is there evil in this world?
Student: Yes.
Prof: Evil is everywhere, isn’t it? And God did make everything. Correct?
Student: Yes.
Prof: So who created evil?
(Student does not answer.)
Prof: Is there sickness? Immorality? Hatred? Ugliness? All these terrible things exist in the world, don’t they?
Student: Yes, sir.
Prof: So, who created them?
(Student has no answer.)
Prof: Science says you have 5 senses you use to identify and observe the world around you.
Tell me, son…Have you ever seen God?
Student: No, sir.
Prof: Tell us if you have ever heard your God?
Student: No, sir.
Prof: Have you ever felt your God, tasted your God, smelt your God? Have you ever had any sensory perception of God for that matter?
Student: No, sir. I’m afraid I haven’t.
Prof: Yet you still believe in Him?
Student: Yes.
Prof: According to empirical, testable, demonstrable protocol, science says your GOD doesn’t exist. What do you say to that, son?
Student: Nothing. I only have my faith.
Prof: Yes. Faith. And that is the problem science has.
Student: Professor, is there such a thing as heat?
Prof: Yes.
Student: And is there such a thing as cold?
Prof: Yes.
Student: No sir. There isn’t.
(The lecture theatre becomes very quiet with this turn of events.)

Student : Sir, you can have lots of heat, even more heat, superheat, mega heat, white heat, a little heat or no heat. But we don’t have anything called cold. We can hit 458 degrees below zero which is no heat, but we can’t go any further after that.
There is no such thing as cold . Cold is only a word we use to describe the absence of heat
. We cannot measure cold. Heat is energy . Cold is not the opposite of heat, sir, just the absence of it .
(There is pin-drop silence in the lecture theatre.)

Student: What about darkness, Professor? Is there such a thing as darkness?
Prof: Yes. What is night if there isn’t darkness?
Student : You’re wrong again, sir. Darkness is the absence of something. You can have low light, normal light, bright light, flashing light….But if you have no light constantly, you have nothing and it’s called darkness, isn’t it? In reality, darkness isn’t. If it were you would be able to make darkness darker, wouldn’t you?
Prof: So what is the point you are making, young man?
Student: Sir, my point is your philosophical premise is flawed.
Prof: Flawed? Can you explain how?
Student: Sir, you are working on the premise of duality. You argue there is life and then there is death, a good God and a bad God. You are viewing the concept of God as something finite, something we can measure. Sir, science can’t even explain a thought.. It uses electricity and magnetism, but has never seen, much less fully understood either one.To view death as the opposite of life is to be ignorant of the fact that death cannot exist as a substantive thing. Death is not the opposite of life: just the absence of it.
Now tell me, Professor.Do you teach your students that they evolved from a monkey?
Prof: If you are referring to the natural evolutionary process, yes, of course, I do.
Student: Have you ever observed evolution with your own eyes, sir?

(The Professor shakes his head with a smile, beginning to realize where the argument is going.)
Student: Since no one has ever observed the process of evolution at work and cannot even prove that this process is an on-going endeavor, are you not teaching your opinion, sir? Are you not a scientist but a preacher? (The class is in uproar.)
Student: Is there anyone in the class who has ever seen the Professor’s brain?
(The class breaks out into laughter.)
Student : Is there anyone here who has ever heard the Professor’s brain, felt it, touched or smelt it? No one appears to have done so. So, according to the established rules of empirical, stable, demonstrable protocol, science says that you have no brain,sir.
With all due respect, sir, how do we then trust your lectures, sir?
(The room is silent. The professor stares at the student, his face unfathomable.)
Prof: I guess you’ll have to take them on faith, son.
Student: That is it sir… The link between man & god is FAITH . That is all that keeps things moving & alive.

This message has been in circulation since at least 2008, with the student’s name being APJ Abdul Kalam, Albert Einstein, Swami Vivekanand. Have you received this in anyone others name?

शिवथरघळ : वाचावाच असा एक अद्भूत वैज्ञानिक चमत्कार!!!

एकदा सहज म्हणून शिवथर घळीत गेलो होतो. रहायला नेहेमी मिळते तशी मोफ़त खोली मिळाली…आज फ़ारसे भाविक नसल्याने व्यवस्थापकांनी अजुन कुणाला तरी माझ्याच खोलीत विनंती करून रहावयास पाठविले.
एक चांगली जाडजूड वजनदार सॅक घेऊन एक चाळिशीच्या पुढचे गृहस्थ आत आले! “हाय! मी भोपळे!” ओळख करून दिली गेली. मनुष्य पेहेरावावरून मॉडर्न वाटत होता…इतक्यात त्यांनी पॅंटच्या खचाखच भरलेल्या खिशांतून काही इक्विपमेंट्स काढून टेबलावर मांडली…माझी उत्कंठा ताणली गेली..”हे काय आहे?” “ही जीपीएस मशीन्स आहेत,,,डू यू नो व्हॉट जीपीएस इज?”
माझ्यातला सुप्त शास्त्रज्ञ जागा होऊ लागला! “येस, आय नो…पण आपण इतकी सारी जीपीएस यंत्रे का वापरता?” हसत हसत ते म्हणाले,”मी जीपीएस वेंडर आहे. माझा तो व्यवसायच आहे ” असे म्हणत त्यांनी माझ्या उत्कंठित चेहे-यावरचे भाव ओळखत लॅपटॉप बाहेर काढला आणि म्हणाले,” हे जे प्रेझेंटेशन आहे जे मी आता तुम्हाला दाखविणार आहे याचे मी बाहेर किमान ५-५० हजार रुपये घेतो! पण तुम्ही समर्थ भक्त आहात म्हणून तुम्हाला हे ज्ञान मोफ़त!”
असे म्हणत त्यांनी सुमारे एक तास अतीशय सखोल पणे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम अर्थात जीपीएस ची इथ्यंभूत माहिती मला सांगितली…ज्ञानात चांगलीच भर पडली! आता तुम्ही म्हणाल याचा आणि शिवथर घळीचा काय संबंध? मलाही तोच प्रश्न पडला! पण खरी गम्मत तर पुढे आहे! वाचत रहा!
भोपळे म्हणाले, चलो यंग मॅन, आता थियरी खूप झाली, आता थोडे प्रॅक्टिकल करुयात…असे म्हणत ती सर्व यंत्रे घेऊन आम्ही बाहेर आलो…उघड्या आकाशाखाली…कारण जीपीएस ला ओपन स्काय अर्थात खुले आकाश लागते! त्या आकाशातील उपग्रह या आपल्या हातातील यंत्राला त्याची पोझीशन, स्थान सांगत असतात! आता माझी परीक्षा सुरु झाली!
भोपळे: बर, वर पहा, किती डिग्री आकाश खुले आहे?
मी: ९० तरी असेल
भोपळे: गूड..मग मला सांगा अत्ता या स्पेस मध्ये साधारण किती सॅटेलाईट्स असतील?
मी: तुम्ही मघाशी सांगितलेत त्याप्रमाणे ३० एक तरी असावेत.
भोपळे: करेक्ट! लेट्स व्हेरीफ़ाय!
असे म्हणत त्यांनी जमिनीवर मांडलेली सर्व यंत्रे एक एक करत सुरू केली. कुणी २० उपग्रह पकडले (उपग्रहांची रेंज पकडली), कुणी २४, कुणी २८…
नियमानुसार २४ उपग्रह असतील तर एक मिटरपर्यंत अचूक स्थान सांगता येते तसे त्या यंत्रांनी सांगितलेही!
भोपळे: मी जगभरातील अनेक देश फ़िरलोय…सगळीकडे या यंत्रांचे असेच बिहेवियर असते.
आता मात्र मला रहावेना, मी म्हणालो, भोपळे सर, आपण इतके उच्चशिक्षित आणी शास्त्रसंपन्न आहात तर या इथे खबदाडात, खनाळात कसे काय वाट चुकलात?
“तीच तर गम्मत आहे!” भोपळे हसत हसत म्हणाले! “इथे रायगड पोलीस स्टेशन च्या वायरलेसचे काम करयाला आलो होतो. सर्वेक्षणच होते म्हणजे..आणि अचानक एक चमत्कार झाला!”
मी अति उत्सुकतेने ऐकत होतो!
“डु यु वॉंट टू विटनेस इट? या माझ्या सोबत!” असे म्हणत ते मला शिवथर घळीच्या तोंडापाशी घेऊन गेले.
“वर पहा, किती आकाश आहे?”
मी: ७० अंश तरी आहेच आहे.
मग किती उपग्रह दिसावेत?
मी:निदान २०-२५?
करेक्ट, नाऊ लेट्स चेक…असे म्हणत त्यांनी पुन्हा सर्व यंत्रे खुल्या आकाशाखाली मांडून सुरु केली..आणि काय आश्चर्य! जर्मन, चायनीज, जपानी, अमेरिकन, ब्रिटिश, कोरियन अशा सर्व बनावटीच्या एकाही यंत्राला एकाही उपग्रहाची रेंज येईना! चमत्कारच हा! उपग्रह नजरेच्या टप्प्यात होते! पण यंत्रांना मात्र सापडत नव्हते, म्हणजे त्या घळीभोवती असे काहीतरी क्षेत्र होते जे उपग्रहांच्या फ़्रीक्वेन्सीज खाली पोहोचूच देत नव्हते!
भोपळे म्हणाले, पूर्ण जग फ़िरलो परंतु अब्सोल्युटली फ़्रीक्वेन्स्वीलेस अशी केवल हीच एक जागा पाहिली! आणि मग मला समर्थांच्या शिवथर घळीचे वर्णन करणा-या ओळी झर्र्कन स्मरल्या!
विश्रांती वाटते येथे। यावया पुण्य पाहिजे!!
विश्रांती! शांतता! फ़्रीक्वेन्सीलेस अवस्था! निर्विचार स्थिती!
अशा स्थीतीत केवळ आपल्याच मनातले विचार ऐकु येणार! त्यात भेसळ होणे नाही! आणि म्हणूनच समर्थांनी दासबोध लिहायला ही जागा निवडली असणार!
म्हणूनच हा ग्रंथ शुद्ध समर्थांचाच आहे!
अंगावर काटा उभा राहिला, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या…
भोपळेंचे मनापासून आभार मानत घळीत पाय ठेवला…समार्थांच्या पायावर लोटांगण घातले…आज तिथे भासणारी शांतता अधीक खोल होती…अधीक गंभीर होती…अधीक शांत होती! भ्रांत मनास विश्रांती खरोखरीच वाटत होती!
आधुनिक विज्ञानास जे गवसले ते माझ्या या माऊलीला ४०० वर्षांपूर्वीच केवळ जाणिवेने जाणवले होते!
दासबोधाचे जन्मस्थान म्हणजे रायगडाजवळील शिवथरची घळ हे समीकरण आता सर्वांनाच माहिती आहे! परंतु ही अद्भुत घळ आपण प्रत्यक्षात पाहिली आहे का हो? नसेल तर अगदी अवश्य पहा! आणि सर्वांना सांगा!

||श्रीराम समर्थ||

यात वैदन्यानिक चमत्कार वगैरे काहीही नाही.  मास्टर्स याच क्षेत्रात झालेल्या आदित्य साठे या आमच्या सूत्राकडून समजते की GPS ही अमेरिकन प्रणाली आहे जी तुमचे पृथ्वीवरील स्थान दर्शवते. त्या प्रणालित एकूण 24 उपग्रह आहेत जे सम्पूर्ण पृथ्वीला व्यापतिल अशा प्रकारे विखुरले आहेत. एकावेळी एखाद्या receiver ला जास्तीत जास्त 12 उपग्रहांचे सिग्नल मिळू शकतात.

GPS प्रणाली शिवाय राशियाची GLONASS यूरोपियन संघाची एक, जपानची त्यांच्या देशाला सेवा पुरवणारी एक अशा 4 प्रणाली आत्ता अस्तित्वात आहे. भारत देखील भारतीय उपखण्डात चालेल अशी GAGAN (GPG aided geo-augmented navigation) नावाची प्रणाली विकसित करत असून त्याचे एकूण 12 उपग्रह असणार आहेत. त्यातील 4 आत्तापर्यंत अवकाशात पाठवले आहेत.

जी उपकरणे GPS ची सेवा वापरतात ती इतर प्रणाली क्वचितच वापरु शकतात.

शिवाय अशा कित्येक जागा आहेत जिथे या प्रणालीचे सिग्नल्स चालत नाहीत. कोणत्याही गुहेत अथवा बोगद्यात ही प्रणाली बंद पडते. कित्येक इमारतींच्या तळघरात याचे सिग्नल्स पोचत नाहीत.

हिन्दू धर्म इतर खुप गोष्टींसाठी महान म्हणता येईल पण कृपया ऎसे कोणतेही मेसेजेस आला म्हणून पुढे पाठवला ऎसे करू नका..

कळावे, लोभ असावा….

।।जय जय रघुवीर समर्थ।।

Cosmic rays and cell phones

Original email/message goes like this:

IMP Information:::: Tonight 12:30 – 3:30 be sure to turn off the phone : Singapore TV has announced the news. Please read about it and take care of yourself . Tell your dear relatives and friends : This evening from 12:30 –
3:30 am , dangerous, high radiation, cosmic rays will pass close to the Earth . So please turn off your cell phone . Do not let your cell phone be close to your body , it may cause damage . Please check the Google NASA and BBC News. Forward this message to all you care for.

The fact that there is no mention about any time zone (in addition to no mentions on NASA and BBC of course) proves this is another hoax as radiation doesn’t give a damn to the different time zones.

12 colored moon

Original message goes as follows:

Tonight from 10:24 to 11:44 the moon will be seen in 12 different colours…This happens once in 184 years. ..so please watch the wonder of the nature….. Happy moon watching…

This message/email surfaces once every 184 days or less, making it a complete hoax, other than the fact that it obviously reads like one.

******* Vs. teacher

When ******* was studying law at the University College,  London, a white professor, whose last name was Peters, disliked him intensely. One day, Mr. Peters was having lunch at the dining room when  came along with his tray and sat next to the professor.

The professor said, “Mr ******* , you do not understand. A pig and a bird do not sit together to eat.”

******* looked at him as a parent would a rude child and calmly replied, “You do not worry professor. I’ll fly away,” and he went and sat at another table.

Mr. Peters,  reddened with rage, decided to take revenge. The next day in Class he posed the following question: “Mr******* , if you were walking down the street and found a package, and within was a bag of wisdom and another bag with money, which one would you take ?”

Without hesitating, ******* responded, “The one with the money, of course.”

Mr. Peters , smiling sarcastically said, “I, in your place, would have taken the wisdom.”

******* shrugged and responded, “Each one takes what he doesn’t have.”

Mr. Peters, by this time was fit to be tied. So great was his anger that he wrote on *******’s exam sheet the word “idiot” and gave it to ******* .

******* took the exam sheet and sat down at his desk trying very hard to remain calm while he contemplated his next move.

A  few  minutes later, ******* got up, went to the professor and told him in a dignified polite tone, “Mr. Peters, you signed the sheet, but you did not give me the grade.” 😅😃. Don’t mess with intelligent Indians. One of the best messages ever read!!

This message has been circulating the social media for quite some time. We have seen the story to be about Albert Einstein, Mahatma Gandhi and recently Swami Vivekananda. Let us know in the comments who all have had this story attributed to